नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शासकीय कार्यालयात काम करून घेण्यासाठी लाच देण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. नुकतेच शासकीय काम करून देण्यासाठी तडजोडीअंती तीन हजारांची लाच स्वीकारताना विहितगांव, जि.नाशिक तलाठी सतीश गिरीश नवले (48, फ्लॅट नंबर – 303, अक्षराधारा ई, सँडी बेकरी जवळ, आनंद नगर, उपनगर, नाशिक) व विहितगार तलाठी मदतनीस दत्तात्रेय सुखदेव ताजनपुरे (43, राधिका निवास, उज्वल कॉलनी, पंपिंग स्टेशन रोड, नाशिक, पुणे रोड चेहडी बु.॥) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय तक्रारदार यांच्या पतीचे नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत असल्याने तहसीलदार नाशिक यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र 0.01 चे एकूण मूल्यांकन रक्कम रुपये 1,00,000/- चे 25 टक्के म्हणजे 25, 000/- रुपयेचा भरणा केला असल्याने तहसीलदार नाशिक यांनी आरोपी तलाठी सतीश नवले यांना इतर अधिकारातील तुकडा नियमाधिकरण अधिमूल्य हा शेरा तक्रारदार यांचे पतीचे नाव असलेल्या क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा यासाठी आदेशित केले होते.
तक्रारदार यांचे काम प्रलंबित असल्याने आरोपी लोकसेवक सतीश नवले व त्यांच्यासोबत त्यांचे काम करणारे खाजगी मदतनीस दत्तात्रय ताजनपुरे यांच्याकडे गेले असता त्यांनी त्यांचे काम करून देण्याच्या मोबदल्यात चार हजारांची मागणी केली मात्र तीन हजारात तडजोड झाल्याने एसीबीकडे तक्रार करण्यात आली व लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली. पोलीस संदीप बबन घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींनी हा सापळा यशस्वी केला.