Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कपड्याच्या दुकानात आगीचे तांडव : ७ जणांचा होरपळून मृत्यू
    क्राईम

    कपड्याच्या दुकानात आगीचे तांडव : ७ जणांचा होरपळून मृत्यू

    editor deskBy editor deskApril 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    शहरातील छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानात वरच्या मजल्यावर असलेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचा देखील समावेश आहे.

    आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते. जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात ही आग लागली. या घरातील पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या इमारतीला पहाटे 4 च्या सुमारास अचानक आग लागली. कपड्याचे दुकान असल्याने आग काही वेळातच पसरली. यात दुकानात वरच्या मळ्यात झोपलेले एकाच कुटुंबातील सात जण होरपळून ठार झाले. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.

    या आग लागलेल्या इमारतीत एकूण 16 लोक होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर 2 लोक होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे.  एका चार्जिंगच्या दुचाकीमध्ये जोराचा स्फोट झाला. यावेळी या दुचाकीला चार्जिंगसाठी चार्जर लावण्यात आलेले होते. त्यामुळे वायरच्या माध्यमातून आग थेट दुकानात लावलेल्या चार्जिंग सॉकेटपर्यंत पोहचली आणि दुकानात देखील आग लागली. कपड्याचे दुकान असल्याने काही वेळातच आग संपूर्ण दुकान आणि त्यानंतर ईमारतमध्ये पसरली. विशेष म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असल्याने खालच्या लोकांना वरती जाता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील लोकांना वाचवण्यात अपयश आले.

    या घटनेबाब मिळालेल्या आधिकच्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळेस या तीन मजली इमारतीत एकूण 16 लोक होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर 2 लोक होते. या दुकानाला लागलेली आग इतकी भीषण होती की, यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात होरपळून मृत्यू झाला. तर इतर लोक गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले की, पहाटे चारला छत्रपती संभाजीनगरातील छावणी रिसरात एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. प्राथमिक तपासानंतर या दुर्घटनेत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मात्र, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. सध्या पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.