Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतातून लोखंडी गेटसह जाळ्यांचे बंडल चोरणारा अटकेत
    क्राईम

    शेतातून लोखंडी गेटसह जाळ्यांचे बंडल चोरणारा अटकेत

    editor deskBy editor deskApril 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील विटनेर शिवारातील शेतातून लोखंडी गेटसह जाळीचे बंड लांबवल्याची घटना घडली होती. दरम्यान, हे साहित्य चोरणाऱ्या समाधान अशोक गायकवाड (वय २८, रा. विटनेर, ता. जळगाव) या संशयिताच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथे भरत अभिमान पाटील हे वास्तव्यास असून ते कॉन्ट्रॅक्टर आणि शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जळगाव तालुक्यातील विटनेट शिवारातील शेत गट क्रमांक ५८ मध्ये काम सुरू होते. त्याठिकाणी त्यांनी २०० किलो वजनाचे लोखंडी गेट आणि लोखंडी जाळ्याचे बंडल असा एकुण ६० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल दि. १८ मार्च रोजी ठेवलेला होता. दरम्यान हा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि. २८ मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरविली. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ही चोरी विटनेर गावातील समाधान अशोक गायकवाड याने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संशयिताच्या गावातूनच मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला.

    ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावीत, एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल मोरे, पोउनि गणेश चौभे, स.फौ. अनिल जाधव, पोहेकॉ सुनिल दामोदरे, प्रविण मांडोळे, हेमंत पाटील, बबन पाटील, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.