• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शरद पवार गटाचे पाच उमेदवार जाहीर ; ‘यांना’ मिळाली संधी !

editor desk by editor desk
March 31, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
शरद पवार गटाचे पाच उमेदवार जाहीर ; ‘यांना’ मिळाली संधी !

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी अखेर शनिवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली. पाच जणांच्या या यादीत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, नीलेश लंके, अमर काळे, भास्कर भगरे यांच्या नावांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आलेल्या माजी आमदार नीलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे. वर्ध्यातून अमर काळे यांना तर दिंडोरीतून भास्कर भगरे यांना संधी देण्यात आली आहे.

बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या भावजय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. यामुळे बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे. शिरूरच्या जागेवर अमोल कोल्हे यांची लढत नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे. नगर दक्षिणच्या जागेवर उमेदवारी जाहीर झालेल्या नीलेश लंके यांची थेट लढत भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे-पाटील यांच्याशी होणार आहे, तर दिंडोरीच्या जागेवर भास्कर भगरे यांची लढत केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

४० फुट विहिरीत अडकला : तीन तासाने वाचले मजुराचा प्राण

Next Post

सालदाराचा खून प्रकरणी : चार तासात आरोपी जाळ्यात

Next Post
सालदाराचा खून प्रकरणी : चार तासात आरोपी जाळ्यात

सालदाराचा खून प्रकरणी : चार तासात आरोपी जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group