जळगाव : प्रतिनिधी
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून उत्तम प्रशासक म्हणून आदर्श निर्माण केला. “सूर्य, चंद्र जातील पण शिवराय आणि शिवरायांचे विचार कायम राहतील. शिवरायांचे चरित्र सर्वासाठी कायम प्रेरणादायी व ऊर्जास्रोत्र राहणार आहे, प्रत्येकाने शिवरायांचे विचार जगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी व नशिराबाद येथे शिवजयंती उत्सवाप्रसंगी बोलत होते.
पालकमंत्र्यांनी मिरवणुकीत धरला ठेका
पाळधी येथे शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवप्रेमीसह डीजेच्या तालावर ठेका धरला. यावेळी शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला. सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवप्रेमी सोबत आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी – जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. पाळधी येथे व परिसरात व नशिराबाद येथे बसस्थानक परिसरात भगवे झेंडे, कमानी व बॅनर मुळे वातावरण भगवामय झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांनी केले तर आभार सरपंच विजय पाटील यांनी मानले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी उपाध्यक्ष सरपंच विजय पाटील, शरद कोळी, नशिराबाद माजी सरपंच विकास पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख विकास धनगर, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, चंदू माळी, दिलीपबापू पाटील, यांच्यासह उपसरपंच, सदस्य यांच्यासह शिवसेना भाजपा युतीचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.