सावदा : प्रतिनिधी
पाल बोर घाटातून गुरांची अवैध वाहतूक करतानासहा ट्रकचालकांना सावदा पोलिसांनी पकडले. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. यावेळी वाहनांमधील १०५ म्हशींची सुटका करण्यात आली. या म्हशी सिंगत येथील गोशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी वाहने व म्हशी असा ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, या वाहतुकीची माहिती लोहारा दूरक्षेत्र पोलिस चौकीचे पो.हे.कॉ. खोडपे यांना मिळाली. यानंतर फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या सूचनेनुसार बोर घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फॉरेस्ट चौकीजवळ या सहा गाड्या थांबविण्यात आल्या व पुढील कारवाई केली. सावदा पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एकूण १२ आरोपींनी अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील आहेत. आरोपींमध्ये जहित्यान वाहेवखान (४६, रा. गंगापुरा आष्टा जिल्हा सिहोर), राशिद रईस कुरेशी (२२, रा. गंगापुरा आष्टा), अकबर सिकंदर खान (४२, रा. सियापुरा, जिल्हा देवास), वासिम रजाक कुरेशी (३५, रा. गंगापुरा आष्टा), सलमान अहेमद नूर (३४, रा. पठाणवाडी सारंगपूर, जिल्हा राजगड), अफसर अबरार कुरेशी (३८, रा. नजरवाडीसमोर आष्टा, जिल्हा सिहोर), आझाद बाबू शेख (४५, रा. इंटावा, जिल्हा देवास), फारुख लतीब कुरेशी (२८, रा. नेतवाडा ता. जावर), साईद शहजाद खान (३६, रा. गजरागेट चौराहा, देवास), परवेज सादीक बेग (२२, रा. गोया, ता. नागदा, जिल्हा देवास), अजमवखान रईस खान (२६,रा. अल्लीपूर आष्टा, जिल्हा सिहोर), नजिम नईम कुरेशी (२९, काजीपुरा आशा, जिल्हा सिहोर).