Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयडीसी पोलिसांची कारवाई : चाकूच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
    क्राईम

    एमआयडीसी पोलिसांची कारवाई : चाकूच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

    editor deskBy editor deskMarch 28, 2024Updated:March 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील नेहरू नगरात दुचाकीने ने जात असलेल्या व्यापाराची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत स्कुटीला लावलेले पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार २६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता घडली. या प्रकरणातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी बुधवार २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अटक केली, त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नेहरू नगर परिसरातील ओम गोपाल चुघरा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून चहा पावडरचा व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. मंगळवार २६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता ओम सुधरा हे त्यांची स्कुटी (एमएच १९ डीएन ७८२९) ने घरी नेहरू नगरात जात असतांना संशयित आरोपी गौरव खुशाल जयस्वाल वय-२० रा. नाथवाडा जळगाव याने व्यापाऱ्याची दुचाकी आडवून चाकूचा धाक दाखवत स्कुटीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी गौरव जयस्वाल याला नाथवाडा परिसरातून अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला .

    दरम्यान गौरव जयस्वाल हा याच व्यापाऱ्याकडे दोन वर्षांपूर्वी कामाला होता ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये पैसे गमावल्याने त्याला आलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्याने जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, चंद्रकांत पाटील, साईनाथ मुंडे, रवी पाटील यांनी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित आरोपीला कारागृहात रवानगी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.