Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कुत्रा आडवा आल्याने बस व दुचाकीचा अपघात : दोन तरुण गंभीर
    क्राईम

    कुत्रा आडवा आल्याने बस व दुचाकीचा अपघात : दोन तरुण गंभीर

    editor deskBy editor deskMarch 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ममुराबाद गावाजवळ बुधवारी सायंकाळी सहा वाजता रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने भरधाव एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, आलम शेख (वय २८) आणि सादिक जुम्मा पिंजारी (२०, दोघे रा.आझादनगर, पिंप्राळा, जळगाव) हे दोघे रोजा सोडण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकीने (जीजे ०६ केई ०५४२) जळगावला जात होते. समोरून येत असलेल्या एसटी समोर (एमएच १४ बीटी २२१६) कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने पुढील दुचाकीला जबर धडक दिली व त्यानंतर झाडाला एसटी धडकली. या अपघातात दुचाकीवरील आलम शेख व सादिक पिंजारी हे जबर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.