बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भागात खळबळजनक घटना घडत असतांना एक संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घडली आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याद्यापिकेने शाळेतील ८ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केलाय. शाळेतील केळी वाटपादरम्यान मला निकृष्ट दर्जाची केळी दिल्याची तक्रार या विद्यार्थ्याने पालकाकडे केली होती. याचा राग मनात धरून मुख्याद्यापिकेने विद्यार्थ्यासोबत अश्लिल वर्तन केले. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ वर्षीय चिमुकला शेगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतो. १५ मार्च रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आली होती. दरम्यान, मुख्याद्यापिकेने आपल्याला खराब केळी दिल्याची तक्रार ८ वर्षीय विद्यार्थ्याने पालकाकडे केली. यावर विद्यार्थ्याच्या वडिलांनी थेट शाळा गाठत मुलांना खराब केळी का दिली? असा जाब मुख्याद्यापिकेला विचारला. या गोष्टीचा राग मनात धरून मुख्याद्यापिकेने विद्यार्थ्याला एका खोलीत नेले. पालकाकडे माझ्याबद्दल तक्रार करतो का? माझी बदली करायला लावतो का? असे म्हणत त्याची पॅन्ट उतरवली. इतकंच नाही, तर मुख्याद्यापिकेने विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे देखील केले. या प्रकारानंतर ८ वर्षीय मुलगा घाबरला. त्याने शाळेतून थेट घराच्या दिशेने धाव घेत घडलेल्या प्रकार वडिलांना सांगितला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुख्याद्यापिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.