• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महाराष्ट्रातील कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर ; हे आहेत उमेदवार !

editor desk by editor desk
March 22, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
महाराष्ट्रातील कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर ;  हे आहेत उमेदवार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी रात्री ५७ उमेदवारांच्या नावाची तिसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात उमदेवारांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून अॅड. गोवाल के. पाडवी, लातूरमधून शिवाजी काळगे, नांदेडमधून वसंत चव्हाण, अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाने उमेदवार जाहीर केला असून तेथे साजिद खान पठाण यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यावेळी अरुणाचल प्रदेशातील २, गुजरातमधील ११, कर्नाटकातील १७, राजस्थानातील ६, तेलंगणातील ५, पश्चिम बंगालमधील ८ आणि पुद्दुचेरीमधील एका उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली.

नुकतीच भाजपकडूनही महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेसच्या यादीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार काँग्रेसकडून गुरुवारी रात्री महाराष्ट्रातील आपल्या सात उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूरमधून गतवेळचे उमेदवार तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. पुण्यातून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंत चव्हाण, नंदुरबारमधून अॅड. गोवाल के. पाडवी, तर लातूरमधून शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Previous Post

धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

गंभीर गुन्ह्यातील चार जणांची टोळी हद्दपार

Next Post
गंभीर गुन्ह्यातील चार जणांची टोळी हद्दपार

गंभीर गुन्ह्यातील चार जणांची टोळी हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group