• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवले

editor desk by editor desk
March 21, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
जळगाव जिल्ह्यात राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवले

जळगाव : प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आचारसंहितेत करावयाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून 72 तासात जळगाव लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील एकूण 31 हजार 562 विविध राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवण्यात आले आहेत तर रावेर लोकसभा मतदारसंघातील 20 हजार 166 बॅनर्स, स्टिकर्स, पोस्टर्स, झेंडे, हटविण्यात आले असून कोनशिला झाकण्याची कार्यवाही देखील करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी दिली आहे.

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने केल्यानंतर आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे.आदर्श आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर 24 तासात जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहरातून 55, जळगाव ग्रामीण मतदार संघातून 2347, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 407, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 291, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 2517, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 2445 असे एकूण 8062 बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटविण्यासोबतच कोनशीला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 1596, रावेर विधानसभा मतदारसंघातून 831, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 586, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 2931, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 42, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून984 असे एकूण 6,934 बॅनर्स, झेंडे,पोस्टर्स तसेच कोन शिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
निवडणूक 2024 च्या सार्वत्रिक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर 48 तासात जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून 163, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 3923, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 1125, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 455, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 2766, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 4023 असे एकूण 12,463 विविध राजकीय पक्षांच्या जाहिराती असलेले पोस्टर्स,बॅनर्स,झेंडे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 771, रावेर विधानसभा मतदारसंघातून 541, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 649, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 2195, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 253, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून 734असे एकूण 5125 बॅनर्स, पोस्टर्स,झेंडे फलके हटवण्याचे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा झाल्यानंतर 72 तासात जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून 222, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 5258, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 1197, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 570, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 1408, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 2382 असे एकूण 11,037 बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटवण्याचे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 3273, रावेर विधानसभा मतदारसंघातून 491, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 360, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 3266, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 346, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून 371, असे एकूण 8107 बॅनर्स,पोस्टर्स, झेंडे, तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

Previous Post

तर.. खासदार उन्मेश पाटील कोणाकडून लढणार ? उमेदवारी बाबत राजकीय वर्तुळात चर्चा

Next Post

शिर्डीत भरदिवसा गोळीबार ; शहरात खळबळ

Next Post
साक्री फाट्यावर झालेल्या गोळीबारात जखमी तरुणाचा मृत्यू !

शिर्डीत भरदिवसा गोळीबार ; शहरात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group