लाईव्ह महाराष्ट्र : विजय पाटील
भारतीय जनता पार्टीने जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना डावलून त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राजकीय घडामोडीत अलिप्त असलेले खासदार पाटील यांच्याबाबत राजकीय वर्तुळांमधून ठाकरे गटाकडून केवळ निवडणूक लढवू शकता अशी चर्चा आता रंगू लागली आहे. याबाबत ठाकरे गटाकडूनही त्यांना संपर्क केला गेल्या असल्याबाबतची ही विश्वसनीय माहिती समोर येत आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून प्रचाराला सुरुवात झाली असून कार्यकारणीच्या बैठकांनाही सुरुवात झाली आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट ही निवडणूक लढविणार आहे. मात्र त्यांच्याकडून सक्षम उमेदवार शोध अद्याप सुरू असून उमेदवार निश्चित झालेला नाही. मात्र काही दिवसापासून खासदार पाटील ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची ही चर्चा सुरू आहे.
उमेदवारीचा शोध कायम ?
शिवसेना ठाकरे गटाकडून अद्याप जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण असणार हा सस्पेन्स कायमच आहे? याबाबत संपर्कप्रमुख संजय सावंत हे जळगाव दौऱ्यावर आलेले आहे. अनेकांशी सावंत यांच्या भेटीगाठी झाल्या असल्याची माहिती समोर आली असून एक-दोन दिवसात ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तर.. पाटील पक्ष लढू शकता ?
भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे खासदार पाटील हे वेट अँड वॉच भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र मतदारसंघात अनेक ठिकाणी त्यांच्या भेटीगाठी सुरू असून मोर्चा बांधणी त्यांच्या सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तर महाविकास आघाडी कडून पुरस्कृत राहून ते अपक्ष देखील जळगाव लोकसभा मतदार संघाच्या रणांगणात उतरण्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे.