जळगाव : प्रतिनिधी
विट्टभट्टीवर काम करणारा मजूराने दुचाकी चोरुन तो वापरत असतांना एलसीबीच्या पथकाला मिळून आला. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. अर्जुन सुरेश कुंभार (रा. बोरावल गेट, यावल) असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौघुले प्लॉट परिसारातून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याठिकाणाहून चोरलेली दुचाकी यावल येथील विटभट्टीवर काम करणारा मजूर अर्जुन कुंभार हा वापरत होता. परंतु गुन्हा घडल्यापासून संशयित चोरटा फरार होता. दुचाकी चोरणारा अर्जुन कुंभार हा बोरावल गेट जवळ आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोहे कॉ महेश महाजन, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने संशयित अर्जुन कुंभार याला ताब्यात घेत विचारपुस करीत असतांना तो पळून जावू लागला. परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत मुसक्या आवळल्या. पुढील कार्यवाहीसाठी संशयित चोरट्याला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.