जळगाव : प्रतिनिधी
नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जगदीश हिलाल ठाकरे (वय ३८, रा. सुटकार, ता. चोपडा) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झत्तला. ही घटना सोमवारी रात्री कानळदा रस्त्यावर आव्हाणे फाट्याजवळ घडली. या प्रकरणी धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील सुटकार येथे जगदिश ठाकरे हे वास्तव्यास होते. शेतीकाम करुन ते आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दि. १७ रोजी जगदिश ठाकरे व ज्ञानेश्वर पंडित ठाकरे हे धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते रात्री दुचाकीने ते सुटकार येथे परतत असताना आव्हाणे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू (एमएच १९, सीवाय ७३३९) क्रमांकाच्या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये जगदिश ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाले तर ज्ञानेश्वर ठाकरे हे गंभीर जखमी झाले.