Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून रमेश पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा
    जळगाव

    जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून रमेश पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा

    editor deskBy editor deskMarch 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी

    लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी बाबत महाविकास आघाडी कडून जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जागा सुटलेली आहे. मात्र उमेदवार मिळत नसल्याने अजूनही उमेदवारीच्या शोधात शिवसेना असून आता रमेश माणिक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

    जळगाव लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून शिवसेना निवडणूक लढवीत आहे. या निवडणुकीसाठी आधी ललिता पाटील कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतु अजूनही शिवसेनेकडून उमेदवारी कोणाला मिळेल दिले जाईल याबाबत स्पष्ट झालेले नसून भाजपच्या स्मिता वाघ यांच्याविरुद्ध सक्षम उमेदवार देण्याबाबत शिवसेना कडून अजूनही शोध सुरूच आहे. मुंबई येथे उमेदवारी बाबत घडामोडी घडत असून शिवसेनेचे संपर्कप्रमुख हे देखील जळगाव आज येण्याची शक्यता आहे. तसेच येत्या दोन दिवसात शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

    रमेश पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा
    जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी एरंडोल येथील तसेच माजी जिल्हा परिषद समिती सदस्य रमेश माणिक पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. परंतु अद्याप उमेदवारी बाबत शिवसेनेतर्फे चित्र स्पष्ट झालेले नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.