Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चारचाकीला भरधाव वाहनाची धडक : जळगावात पाच जखमी !
    क्राईम

    चारचाकीला भरधाव वाहनाची धडक : जळगावात पाच जखमी !

    editor deskBy editor deskMarch 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आईला भेटण्यासाठी जात असलेली मुलगी, जावयाच्या कारला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाले. ही घटना रविवार दि. १७ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास महामार्गावर खोटेनगरजवळ घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील माहेर असलेल्या प्रतीक्षा सचिन पाटील (वय २५, रा. आयोध्यानगर) यांच्या आईची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा यांच्यासह त्यांचे पती सचिन पाटील (वय ३५), मुलगा देवांश सचिन पाटील (वय वय अडीच वर्षे) तसेच प्रतीक्षा यांची बहीण नंदीनी पाटील (वय १९), विनोद सोपान पाटील (वय ४५) हे कारने रविवारी दुपारी एरंडोल येथे जाण्यासाठी निघाले. त्यांची कार खोटे नगरच्या पुढे गेल्यानंतर समोरून येणाऱ्या चारचारी वाहनाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारला समोरून धडक दिली. त्यात कारमधील पाचही जण जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. जखमींना तात्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.