Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात गावठी कट्टा घेऊन फिरणारा अटकेत
    क्राईम

    जळगावात गावठी कट्टा घेऊन फिरणारा अटकेत

    editor deskBy editor deskMarch 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात बेकायदेशीररित्या गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या रितेश गजानन सोनवणे (वय २०, रा. शिरसोली इंदिरानगर) याच्यावर शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खान्देश सेंट्रल मॉलच्या पार्कीगमध्ये शिरसोली इंदिरानगरातील रितेश गजानन सोनवणे हा तरुण (एमएच एमएच १९ बीडी ५३४७) क्रमांकाच्या मोटारसायकलजवळ उभा होता. त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी तात्काळ खान्देश सेंट्रल मॉल परिसरात धाव घेतली. संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या रितेश सोनवणे याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टा व जीवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी तेजस मराठे याच्या तक्रारीवरुन संशयित रितेश सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.