Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जमिनीवर डोके आपटून तरुणाचा खून
    क्राईम

    जमिनीवर डोके आपटून तरुणाचा खून

    editor deskBy editor deskMarch 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    तालुक्यातील सातगाव तांडा येथील तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील सातगाव तांडा येथे २२ वर्षीय तरुण पोपट ओमकार राठोड हा तरुण आपल्या तर परिवारासह वास्तव्याला होता. रविवार १० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा राहुल अभिमान अल्हाड वय-२५ याने गावातील बसस्थानक जवळ शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर मारहाण केली आणि जमिनीवर डोके आपटल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर गावात खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहुल अभिमान अल्हाड यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; ‘माझा घातपात करण्याचा कट सरकारकडून दडपला जातोय’

    December 8, 2025

    मध्यरात्री महिलेच्या घरात शिरून केला विनयभंग !

    December 8, 2025

    बायपासवर भीषण अपघात; कार दोनदा उलटून थेट ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडक

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.