• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बैलगाडी उलटल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

editor desk by editor desk
March 12, 2024
in क्राईम, जळगाव
0
बैलगाडी उलटल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी

चारा घेऊन येत असताना शेताच्या बंधाऱ्यावरून अचानक बैलगाडी उलटल्याने कठड्याला लावलेला लोखंडी विळा डोक्यात घुसल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता जळगाव तालुक्यातील वाकडी गावानजीक घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरव आनंदा पाटील असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वाकडी येथे गौरव हा आई-वडील, भाऊ आणि बहीण यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो म्हसावद गावातील थेपडे विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी दुपारी चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडीने गेला. शेतात चारा घेऊन येत असताना दुपारी अडीच वाजता बैलगाडीने शेताच्या बांधावरून येत असताना अचानक बैलगाडी उलटली. यात बैलगाडीच्या कठड्याखाली गौरव दाबला गेला. त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुस्सर तुटली. यामुळे लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळात घुसला. घटनेत गौरव पाटील हा जागीच ठार झाला. शेताजवळ असलेल्या काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.

Previous Post

बस व ट्रकचा अपघात : १२ प्रवासी जखमी

Next Post

३५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Next Post
३५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

३५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील तीन ठार तर दोन गंभीर !
क्राईम

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील तीन ठार तर दोन गंभीर !

May 31, 2025
उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !
राजकारण

उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !

May 31, 2025
मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !
आरोग्य

मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !

May 31, 2025
चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !
क्राईम

चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !

May 31, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

अकरावी प्रवेशासाठी घेतली दोन शिक्षकांनी लाच !

May 31, 2025
धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !
क्राईम

धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !

May 31, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group