• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींची प्रशासकीय मान्यता !

पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा मास्टर स्ट्रोक !

editor desk by editor desk
March 9, 2024
in जळगाव, धरणगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
धरणगावात उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींची प्रशासकीय मान्यता !

धरणगाव – प्रतिनिधी
धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर असून येथिल बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड करण्यात आलेल्या ठिकाणी आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी भव्य दिव्य उपजिल्हा रूग्णालय उभारले जावे यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून पालकमंत्री एवढ्यावरच न थांबता सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान बांधकामाच्या 40 कोटीच्याअंदाजपत्रकास व आराखड्यानां मान्यता मिळाली आहे. या उपजिल्हा रुग्णालयाचे मान्यतेसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा करून धरणगाव वासीयांची मागणी पूर्ण झाली असल्याने धरणगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.*
धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने नुकतीच मंजुरी मिळाली होती. कालच उपजिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी रुपये 39 कोटी 46 लक्ष 75 हजार इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे धरणगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याने तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार व्यक्त करतो.
असे असेल उप जिल्हा रुग्णालय
सदर अंदाजपत्रकामध्ये इमारतीचे बांधकाम G+२ असून निवासस्थान (टाईप-1) G+3, निवासस्थान (टाईप-2) G+3. निवासस्थान (टाईप ३) G+7, निवासस्थान (टाईप-4) G+4 आहे. एकूण इमारतीचे क्षेत्रफळ 8023.85 चौ.मी. इतके आहे. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक, उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक व जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी प्रमाणित केले नुसार 50 खाटांचे उप जिल्हा रुग्णालय, येथील मुख्य रुपये 39 कोटी 46 लक्ष 75 हजार इतक्या रकमेच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
अश्या असतील सुविधा
बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरात होणाऱ्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतरुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसुतीग्रुह, शस्त्रक्रिया ग्रुह, शवविच्छेदन विभाग, वाहन सुविधा (रुग्णवाहिका), नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण (TB), न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्र तपासणी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामंतर्गत आरोग्य सुविधा, मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया, एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडुन मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र, रक्त पुरवठा केंद्र द्वारे रुग्णांना उपचार केले जाणार आहेत.
Previous Post

ब्रेकिंग : दोन लिपिकांनी घेतली ३० हजारांची लाच

Next Post

या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group