नाशिक : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष नव्हे तर निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली मोळी असल्याची तिखट टीका त्यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर केली आहे. महाराष्ट्रात केवळ तीनच पक्षांची स्थापना झाली. यात जनसंघ, शिवसेना व महाराष्ट्र निर्वाण सेनेचा समावेश आहे, असे ते म्हणालेत. राज ठाकरे यांनी मनसेला कोणत्याही स्थितीत यश मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रात केवळ तीनच पक्ष निर्माण झाल्याचे नमूद करत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळात पक्षच नसल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही. ती निवडून येणाऱ्या लोकाची बांधलेली मोळी आहे. शरद पवार आतापर्यंत हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी तेच निवडून येणार, असे ते म्हणाले.
नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.
महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ जनसंघ, शिवसेना व मनसे हे तीनच पक्ष निर्माण झाले. हे पक्ष तळागाळातून निर्माण झाले. आणि त्यात विशेष ह्या पक्षातील कार्यकर्ते 99% सर्वसामान्य घरातील होते, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आतून एकच असल्याची टीकाही केली.
मनसेला 18 वर्षे पूर्ण होत असताना मला तुम्हाला राजकीय इतिहास सांगण्याची गरज वाटत आहे. सद्यस्थितीत प्रत्येकाल वडा टाकला की तळून आलेला पाहिजे. सर्वांना फास्टफूड पाहिजे. पण राजकारणात वावरायचे असेल तर संयम हवा असतो. राजकारणात खस्ता खाल्याशिवाय यश मिळत नाही. तुम्हाल नरेंद्र मोदी किंवा भाजपचे यश दिसत असेल. पण भाजपसाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे आदी अनेक नेत्यांनी अनेक वर्षे कष्ट घेतले. खस्ता खाल्या. त्यानंतर त्यांना आज हे यश मिळाले. त्यामुळे आपणही संयम राखण्याची गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले.