• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : १३ वर्षीय मुलाने बालकाला सांडपाण्यात फेकले !

editor desk by editor desk
March 7, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
धक्कादायक : १३ वर्षीय मुलाने बालकाला सांडपाण्यात फेकले !

नाशिक : वृत्तसंस्था

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील हलवाई मशिदी जवळ कारखान्या मागे साचलेल्या सांडपाण्याच्या जवळ खेळताना एका तेरा वर्षीय मुलाने त्याच्या समवेत खेळणाऱ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्या बालकाला सांडपाण्यात फेकल्याची घटना  घडली आहे. या बालकाच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने या बालकाचा मृत्यू झाला.

सुरुवातीला पाण्यात पडल्याने लहानग्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, नंतर सीसीटीव्ही तपासला असता सदरील घटना निर्दशनात आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरील विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेतला जात आहे. काही मुले हे सांडपाण्याच्या डबक्याजवळ खेळत असलेले सीसीटीव्हीमध्ये दिसते. काही वेळाने एका तेरा वर्षीय मुलाने हस्सान मलीक मुदस्सीर हुसेन या साडेतीन वर्षाच्या मुलाला सांडपाण्याच्या डब्यात फेकून दिले. त्यामुळे त्याच्यासोबत असलेली सर्व मुले घाबरली. त्यांनी तेथून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली आहे.

या घटनेनंतर मृत मुलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन पवारवाडी पोलिस ठाण्यात विधी संघर्षग्रस्त बालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक शेख खालीद हाजी यांच्या सूचनेवरून डबक्याजवळ असलेल्या कारखान्याचा सीसीटीव्ही तपासण्यात आला. त्यानंतर ही घटना निदर्शनास आली. सुरुवातीला या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी माजी नगरसेवक शेख खालीद हाजी यांच्या सूचनेवरून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

Previous Post

शहा शेपूट घाले गृहमंत्री ; ठाकरेंचा घणाघात

Next Post

बांधकामाच्या ठिकाणाहून चोरी : तीन संशयित अटकेत

Next Post
बांधकामाच्या ठिकाणाहून चोरी : तीन संशयित अटकेत

बांधकामाच्या ठिकाणाहून चोरी : तीन संशयित अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group