Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात दुचाकीचा भीषण अपघात : तरुण ठार तर काका जखमी
    क्राईम

    जळगावात दुचाकीचा भीषण अपघात : तरुण ठार तर काका जखमी

    editor deskBy editor deskMarch 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रुग्णालयात दाखल असलेल्या चुलत भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी येत असताना दुचाकीला वाहनाचा कट लागला व खाली पडून ट्रक खाली आल्याने संजोग सुरेश सपकाळे (२०, रा. गाढोदा, ता. जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याचे काका नवल बिसन सपकाळे (४७, रा. गाढोदा, ता. जळगाव) हे जखमी झाले आहे. हा अपघात सोमवार, ४ रोजी सायंकाळी ७ वाजता मानराजपार्क जवळ झाला. अपघातानंतर ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गाढोदा येथील नवल सपकाळे यांचा मुलगा जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल असल्याने त्याला डबा देण्यासाठी नवल सपकाळे व त्यांचा पुतण्या संजोग सपकाळे हे दुचाकीने जळगावला येत होते. खोटेनगरकडून शिवकॉलनीकडे येत असताना नवल सपकाळे यांच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारला. त्यामुळे दुचाकीस्वार काका-पुतणे हे रस्त्यावर कोसळले. त्यात संजोग हा मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आला व चिरडला गेला. तर त्याचे काका जखमी झाले आहे.

    अपघातानंतर ट्रक चालक तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले व तरुणाचा मृतदेह व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    April 29, 2026

    मध्यरात्री भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक; चालकासह महिला गंभीर !

    April 29, 2026

    पोलिस दलात ‘टाईम शिस्त’ लागू; उशिरा येणाऱ्यांवर धिवरेंचा कडक दणका!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.