Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskFebruary 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    घरकाम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मनीषा श्यामकांत बाविस्कर (३०, रा. श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना श्रीरत्न कॉलनीत शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, एस.टी.वर्कशॉपमध्ये नोकरीला असलेल्या मनीषा बाविस्कर या शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी घरी काम करत असताना सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यासंदर्भात रामानंदनगर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले.

    महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    भोंदू खरात प्रकरणाचा राजकीय आवाज: सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

    March 21, 2026

    अमळनेरात कॉपी रोखली म्हणून संताप; होमगार्डवर रॉडने हल्ला

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.