नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये माघ पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली. या दुर्घटनेत १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये माघ पोर्णिमेनिमित्त देवाला निघालेल्या भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर तलावात पलटी झाला. या दुर्घटनेत १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ महिला आणि काही लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले.
अनेक गंभीर जखमी भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. घटनास्थळी डीएम, एसपी आणि इतर प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी पोहोचले असून सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, या भीषण अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.