जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूला सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर शहर पोलिसांच्या पथकाने बुधवार दि. २१ रोजी कारवाई केली. याठिकाणाहून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्टेनशनच्या मागील बाजूला उड्डाणपुलाजवळ सार्वजनिक ठिकाणी काही तरुण आमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्याठिकाणी गेले असता, पथकाला याठिकाणी काही तरुण गांजा सारखे आमली पदार्थांचे सेवन करतांना दिसून आले. पथकाने त्यांच्यावर छापा टाकीत कारवाई केली. याठिकाणाहून नरेश मांगिलाल विश्वकर्मा (वय ३२, रा. शिवाजी नगर), तेजस सुरेश गोळे (वय २२) व राहुल जगन्नाथ बिऱ्हाडे (वय ३२, दोन्ही रा. गेंदालाल मिल) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, सफौ बशीर तडवी, पोहेकॉ विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, किशोर निकुंभ, अमोल ठाकूर, तेजस मराठे, रतन गिते यांच्या पथकाने केली.