नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरकारी नोकर भरतीच्या जाहिराती निघाल्या ही त्याच्या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये असते. मात्र सध्या उत्तर प्रदेश पोलीस भरतीच्या परीक्षेला चक्क सनी लियोनी बसल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली आहे. त्यामागचे कारण सुद्धा खास आहे. उत्तर प्रदेश पोलीस भर्तीमध्ये एका व्यक्तीच्या परिक्षेच्या ओळखपत्रावर चक्क सनी लिओनीचा फोटो छापण्यात आला. काल हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस चौकशीसाठी उमेदवाराच्या घरी पोहोचले.
धर्मेंद्र कुमार असे प्रवेशपत्र असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील रगौलिया बुजुर्ग गावचा रहिवासी आहे. रविवारी १८ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे पथक चौकशीसाठी त्याच्या गावी पोहोचले. चौकशीदरम्यान धर्मेंद्र कुमारने सांगितले की, त्याने महोबा येथील कॉम्पुटर कॅफेमधून पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. ज्यामध्ये परीक्षा केंद्र कन्नौजमध्ये आले. सानी लिओनीच्या फोटोबाबत त्याने सांगितले की, हे कसे घडले ते मला डेजगील माहित नाही. तो म्हणतो की, जेव्हा त्याला प्रवेशपत्र मिळाले तेव्हा त्यावर त्याचा फोटो छापण्यात आला होता. पण नंतर हा फोटो कसा बदलला हे कळले नाही.
या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपासानंतर काय घडले हे स्पष्ट होईल. या प्रकरणाबाबत एएसपी सत्यम म्हणाले की, कोणीतरी चुकीच्या नावाने अर्ज केला होता.
धर्मेंद्र कुमार पोलीस भरती परीक्षा देण्यासाठी कन्नौजच्या परीक्षा केंद्रावर आले होते. यावेळी त्याच्याकडे असलेल्या प्रवेशपत्रावर धर्मेंद्रच्या ऐवजी सनी लिओनीचा फोटो होता. त्यामुळे धर्मेंद्र यांना परीक्षेला बसू दिले नाही. तसेच धर्मेंद्र यांच्या प्रवेशपत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. त्यामुळे लोकांची ॲडमिट कार्डाची खणखणीत सुरुवात केली. अनेक मिम्स पेजवरही ते शेअर करण्यात आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी यामागे सोल्व्हर टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. नोकरीसाठीची परिक्षा हा अनेकांसाठी जीवनातील महत्वाचा टप्पा असतो. अशावेळा एखाद्याचा खोडसाळपणा कुणाच्यातरी जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकणारा ठरू शकतो.