• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्य सहकारी पणन महासंघाच्या निवडणुकीत संजय पवार, भाजपचे रोहित निकम बिनविरोध

editor desk by editor desk
February 21, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य
0
राज्य सहकारी पणन महासंघाच्या निवडणुकीत संजय पवार, भाजपचे रोहित निकम बिनविरोध

जळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची बिनविरोध निवडून येण्याची परंपरा कायम राहीली असुन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम देखील बिनविरोध निवडून आले आहे. दूध संघाप्रमाणेच राज्य मार्केटिंग फेडरेशनवर दोन्ही मित्र निवडून आले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीची आज माघारीचा शेवटचा दिवस होता. गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शासनाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. स्थगिती उठल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, ना. अनिल पाटील तसेच आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यात नाशिक विभागा पाच जिल्ह्यातून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार तसेच भाजपाचे उपाध्यक्ष व दूध संघाचे संचालक रोहित निकम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी नासिक येथील अपूर्व हिरे, राजेंद्र ढोकळे, शाहू पाटील, युवराज तनपुरे, दत्ताजी पानसरे व भाजपाचे संजय गरुड, संजीव रघुवंशी या मान्यवरांनी नेत्यांच्या विनंतीवरून उमेदवारी अर्ज मागे घेतले. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या जळगाव विभागातून म्हणजेच जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या विभागातून देखील संजय पवार यांची कापूस उत्पादक पणन महासंघात विभागीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती.

रोहित निकम यांच्या आई श्रीमती शैलजा देवी निकम यांनी यापूर्वी मार्केटिंग फेडरेशन मध्ये अनेक वर्ष संचालक व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे रोहित निकम यांना देखील सहकार क्षेत्रामध्ये घराण्याचा वारसा असल्या कारणाने त्यांनी देखील आता राज्यावर आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित निकम यांचे आजोबा बॅरिस्टर निकम यांनी जळगाव जिल्हा सहकार बोर्डाची स्थापना केली केली आहे. त्यामुळे भाजपाला राज्यस्तरावर रोहित निकम यांच्या रूपाने तरूण, तडफदार व सहकारातील जाण असलेले नेतृत्व मिळालेले आहे. रोहीत निकम यांच्या उमेदवारीसाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन, आ. मंगेश चव्हाण यांनी थेट अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. चर्चे अंती रोहीत निकम यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला. रोहीत निकम यांच्या रूपाने भाजपाने सहकारात ‘एण्ट्री’ केली आहे.

Previous Post

पहाटेच्या सुमारास अल्पवयीन मुलीला पळविले

Next Post

उद्धव ठाकरेंनी केले मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

Next Post
उद्धव ठाकरेंनी केले मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

उद्धव ठाकरेंनी केले मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !
क्राईम

खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !

July 18, 2025
ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !
Uncategorized

ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !

July 18, 2025
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय !
क्राईम

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय !

July 18, 2025
“भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” राज ठाकरेंचा इशारा !
राजकारण

“भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” राज ठाकरेंचा इशारा !

July 18, 2025
विधिमंडळ परिसरात राडा : आ.जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली घुसले !
राजकारण

विधिमंडळ परिसरात राडा : आ.जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली घुसले !

July 18, 2025
व्यापाऱ्याला लुटणारा ‘खेकडा’ अखेर जेरबंद
क्राईम

व्यापाऱ्याला लुटणारा ‘खेकडा’ अखेर जेरबंद

July 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp