Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आक्षेपार्ह पोस्ट भोवली ; एक जण पोलिसांच्या ताब्यात
    क्राईम

    आक्षेपार्ह पोस्ट भोवली ; एक जण पोलिसांच्या ताब्यात

    editor deskBy editor deskFebruary 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एका संशयितास जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या पोस्टमुळे सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शाहूनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली.

    घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, शहर व जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल व अनिल भवारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना शांततेसह अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित हे जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पोहोचले. याठिकाणी एका गटाकडून त्यांना निवेदन देवून संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026

    धरणगाव तालुक्यात क्रूझर उलटून नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    April 29, 2026

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.