अमळनेर : प्रतिनिधी
महिला वाहकाचा विनयभंग करणाऱ्या आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्याविरूध्द अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही अमळनेर आगारात वाहक म्हणून नोकरीस आहे. ३ फेब्रुवारी रोजी अमळनेर-पारोळा बसवर ड्यूटीला असताना आगारप्रमुख इम्रान पठाण यांनी पीडित वाहक महिलेच्या मोबाइलवर फोन करून मंदिरात येशील तेव्हा मला घरी येऊन भेट, असे सांगितले. दुपारी १२:३० वाजता ड्यूटी संपल्याने पीडित व एक महिला वाहक अशा दोघी मंदिरात दर्शनासाठी गेल्या. मात्र, सोबत असलेल्या वाहक महिलेची ड्यूटी असल्याने ती लगेच गेली.
आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्या घरी गेल्यावर जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आपण हाताला झटके देत बाहेर पळाले व उपस्थित असलेल्या महिला वाहकाला सर्व हकीकत सांगितली. घरी जाऊन आईला सर्व हकीकत सांगितली. महिला वाहकाने आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पठाण यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.