Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शरदचंद्रजी पवार संजीवनी आरोग्य मित्र कार्यशाळा पुण्यात उत्साहात
    क्राईम

    शरदचंद्रजी पवार संजीवनी आरोग्य मित्र कार्यशाळा पुण्यात उत्साहात

    editor deskBy editor deskFebruary 13, 2024Updated:February 13, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    शरदचंद्रजी पवार संजीवनी आरोग्य मित्र”.व, एक पाऊल आरोग्य समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने!या उपक्रमाचे उद्घाटन देशाचे लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाविषयी माहिती देणारी कार्यशाळा व भव्य मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार डॅाक्टर सेलद्वारे करण्यात आले.दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी स. 9 ते दु. 2 या वेळेत निसर्ग कार्यालय, मार्केटयार्ड, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

    यावेळी आमदार रोहीतदादा पवार यांच्याबरोबर संपूर्ण युवा संघर्ष यात्रेमध्ये पायी चालत सहभागी झालेल्या संघर्ष यात्रींचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपल्या समस्या व मागण्यांबाबतचे निवेदन सादर केले.
    या कार्यक्रमास रोहीतदादा पवार, विकास लवांडे (राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते), मा. प्रशांतदादा जगताप (शहराध्यक्ष, पुणे), मा. डॉ. सुनील जगताप (डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र), मा. तुषार कामठे, मा. प्रकाश म्हस्के, मा.जयदेवआण्णा गायकवाड, मा पंकजनाना बोराडे, मा. रवी वरपे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) डॉक्टर सेलचे डॉ.सुनील जगताप (प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र), डॉ.नितीन वसंतराव पाटील (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष,डॉ.धैर्यशील पवार (मराठवाडा विभागीय अध्यक्ष), डॉ शिवदीप उंद्रे (पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), डॉ.विजय जाधव (विदर्भ विभागीय अध्यक्ष), डॉ. संतोष खंबाळकर (कोकण विभागीय अध्यक्ष), श्री. सतिश कांबळे (प्रदेश रुग्ण सहाय्यक प्रमुख), डॉ. शशिकांत कदम (अध्यक्ष, पुणे शहर), डॉ. राहूल सूर्यवंशी (राज्य समन्वयक), डॉ. सुनील होनराव, डॅा. हेमंत तुसे, डॅा. राजश्री पोखरना, डॅा. कवीता ढमाले, डॅा. अनुपमा गायकवाड व डॉ.सेलचे महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे राज्यभरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्तावना वाचनाने करण्यात आली.

    डॉ. सेलच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आणि विविध पातळ्यांवरील मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या कामांचा थोडक्यात आढावा छोट्या ध्वनीचित्रफितीद्वारे घेण्यात आला. डॉ. सुनील जगताप यांनी मा. शरद पवार साहेब व मा. रोहीतदादा पवार यांनी डॉ. सेलवर दाखवलेला विश्वास व टाकलेली मोठी जबाबदारी याची जाणीव असल्याचे सांगून ”शरदचंद्र पवार संजीवनी आरोग्य मित्र” हा उपक्रम सुरू करण्यामागची परिस्थिती व भूमिका स्पष्ट केली. सध्या ज्या काही शासकीय योजना आहेत, त्या तळागाळातील, गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्या लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचाव्यात म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांमध्ये डॉक्टरांशिवाय इतर कार्यकर्तेदेखील आरोग्य मित्र म्हणून सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. तसेच महिलांमधील योनीमार्गाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता, त्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट द्वारे निर्माण केली जाणारी लस जर आपण उपलब्ध करून देऊ शकलो, तर ती गोरगरीब मुलींना मोफत देऊन कर्करोगाचा प्रतिबंध केला जाऊ शकतो, असे डॉ. जगताप यांनी सांगितले. त्यांनी मा. शरद पवार साहेबांना विनंती केली की, अशा पन्नास हजार लसी उपलब्ध करून देण्यात आपण लक्ष घालावे. साहेबांनीदेखील लगेचच तसा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

    या उपक्रमाचे समन्वयक श्री. सतिश कांबळे यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात रुग्णसहायक समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सद्यस्थितीकडे लक्ष वेधत आपण एकत्र येऊन दडपशाहीविरूद्ध संघर्षाची गरज अधोरेखित केली. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार’ डॉक्टर सेलच्या कामाची दखल घेत, पुढील कामासाठी प्रोत्साहन दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.