जळगाव : प्रतिनिधी
शहरातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत आहे. गेल्या दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जवळ एक तलवार सापडली असून, ती जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच, तर रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असलेल्या विशाल दाभाडे याला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. तरीदेखील तो शहरात फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकों, गणेश शिरसाळे, पोलिस नाईक योगेश बारी, सुधीर सावळे, पोकॉ. नितीन ठाकूर, मुकेश पाटील, नाना तायडे, किरण पाटील यांनी ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी रामेश्वर कॉलनी परिसरातून विशालला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे एक लोखंडी तलवार सापडली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. विशालला न्यायालयात हजर केले असता, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.