जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरानजीक असलेल्या कुसुंबा येथील रवींद्र नातू पवार (वय ३६) या तरुणावर चॉपरने वार करत लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पाच जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गजानन पार्कमध्ये रवींद्र पवार हे वास्तव्यास आहे. त्यांचा चुलत भाऊ राजेश जगराम पवार याने गावातील काही जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार रवींद्र यानेच द्यायला सांगितल्याच्या संशयावरून दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता औद्योगिक वसाहत परिसरातील एका बेकरीजवळून तो जात असताना कुसुंबा येथील पाच जणांना त्याला अडवले. त्या वेळी त्याच्यावर चॉपरने वार करत लोखंडी रॉड आणि दगडांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी अवस्थेत तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुनिल सोनार, सचिन मुंढे व नरेंद्र मोरे यांनी योगेश दीपक पाटील (वय १८), सागर अशोक कोळी (२८), अक्षय शांताराम कोळी (वय १८), अजय बापू पारधी (२४) व भारत कारभारी चांदोडे उर्फ बंटी गुजर (वय २३, सर्व रा. गजानन कॉलनी, कुसुंबा) या तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली