भुसावळ : प्रतिनिधी
यावल-भुसावळ रस्त्यावर घोडेपीर बाबांच्या दग्र्याजवळ रविवारी सायंकाळी गुजरात राज्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) ड्रग तस्कर तरुणाला पकडले, हा तरुण कारव्दारे आला होता. त्याच्यासोबतचे तीन साथीदार पसार झाले. त्यांच्याकडून एक पिस्तूलसह इतर काही साहित्य हस्तगत करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील मोबीन शाह हा कारने (जी. जे.०५ /आर. एम.८४८०) आला होता. आपल्या मित्रांसोबत तो दर्याबाहेर बसला होता. त्याच्या मागावर गुजरात राज्याचे अमली पदार्थविरोधी पथक होते. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हे पथक येथे दाखल झाले आणि त्यांना पाहून मोबीन शाह पळून जाण्याच्या प्रयत्नात होत होता. मात्र पोलिसांनी त्याच्यावर पिस्तूल रोखले आणि त्यास ताब्यात घेतले. शाह याच्याकडून पोलिसांच्या पथकाने एक पिस्तूल व इतर काही वस्तू हस्तगत केल्या. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार असलम खान, हवालदार भूषण चव्हाण, मुस्तफा तडवी हे दाखल झाले.
शाह यास सुरत येथील दिंडोली पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. या कारवाईत दिंडोली पोलिस ठाण्याचे कुलदीपसिंग हमुभाई दया, दिवेश हरिभाई चौधरी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी सहभागी होते.