• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बोदवड नगरपंचायतीसाठी 72 टक्के मतदान !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 21, 2021
in बोदवड, राजकारण
0
बोदवड नगरपंचायतीसाठी 72 टक्के मतदान !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान झाले. 17 जागांपैकी 13 जागांसाठी मतदान होणार असून 4 जागांची निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे रद्द करण्यात आली आहे. तर 13 जागांसाठी साठी 53 उमेदवार रिंगणात असून 26 मतदान केंद्रावर मतदान पार पडले.

या निवडणुकीच्या माध्यमातून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे.  प्रभाग क्रमांक 11 व 12च्या मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत त्याठिकाणी तळ ठोकून होते.सकाळी मतदानाला संथ गतीने सुरू होते मात्र दुपार नंतर रांगा लागल्या होत्या तर प्रभाग क्रमांक 11 व 12 मध्ये 6.30 वाजेपर्यंत मतदान झाले  72 टक्के मतदान झालं आहे संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे चार जागा वर निवडणूक नंतर होणार असल्याने 13 जागांसाठी आज मतदान संपन्न झाले . मतदानाला सकाळी 7.30 वाजेला प्रारंभ झाला सकाळी थंडी असल्याने  मतदान हळुवार पणे सुरू होते.दुपारी 12 वाजे नंतर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला बोदवड विकासो मतदाराच्या रांगा दिसत होत्या. सायंकाळी 4 वाजेला पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुद्धा प्रभाग क्रमांक 11 च्या केंद्रांना भेट दिली याठिकाणी असलेल्या प्रभाग क्रमांक 11 व 12 च्या बूथ वर सायंकाळी 5.30 वाजेनंतर रांगा लागल्या होत्या त्यामुळे मतदारांना प्रशासनाने टोकन दिले होते टोकन असल्यास वरच मतदानाचा हक्क बजावण्यात येत होता या बूथ वर मतदान सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरू होते.

बोदवड नगरपंचायत मध्ये सकाळी 7.30 वाजेला मतदान सुरू झाले 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 704 पुरुषांनी तर 527 महिलांनी असे एकूण  1231 मतदारांनी आपला हक्क बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत बजावला . 7.96 टक्के मतदान झाले   दुपारी 11.30 वाजेपर्यंत पुरुष  1664 महिला 1616 एकूण 3280 झाले असून  21 टक्के मतदान झाले  .दुपारी 1.30 वाजेपर्यंत  महिला  2855 पुरुष 2953   एकूण 5808 हक्क बजावला असून 37.55 टक्के मतदान झाले होते. दुपारी 3.30 वाजे पर्यत 55.17   टक्के मतदान झाले होते यात महिला  4228 पुरुष 4305 तर   8533 असे एकूण मतदारांनी हक्क बजावला.
शेवटच्या टप्प्यात 5238 महिला 5975 पुरुष 11213 मतदारांनी आपला हक्क बजावला असून 72.50 टक्के मतदान झाले

Previous Post

जितेश राजपुत वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात रवाना !

Next Post

जळगावात मोलकरणीवर अत्याचार : वकिलाविरूध्द गुन्हा !

Next Post
जळगावात मोलकरणीवर अत्याचार : वकिलाविरूध्द गुन्हा !

जळगावात मोलकरणीवर अत्याचार : वकिलाविरूध्द गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

June 26, 2025
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
क्राईम

खळबळजनक :  अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला !

June 26, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात.

June 26, 2025
किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group