Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जडीबुटीचे बोगस औषध देवून फसवणूक करणारा जेरबंद; एलसीबीची कारवाई
    क्राईम

    जडीबुटीचे बोगस औषध देवून फसवणूक करणारा जेरबंद; एलसीबीची कारवाई

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 21, 2021Updated:December 21, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    1 लाख  68 हजारासाठी ब्लॅकमेलिंग करणाऱ्याला एलसीबी अटक केली

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आजारातून बरे होण्यासाठी जडीबुटीचे औषध देण्याच्या बहाणा करून 3 लाख १३ हजार रुपये घेऊन विवस्त्र फोटो काढून 1 लाख 68 हजारासाठी ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागत असलेल्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    याबाबत माहिती अशी की, सुनिल मडकू पाटील (वय-४४) रा. पारोळा जि. जळगाव हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. त्यांनी किरकोळ आजार होता. आजारापासून दिलासा मिळावा म्हणून त्यांनी भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे एका रस्त्यावर औषधाचा विनापरवाना कॅम्प लावणाऱ्या संशयित आरोपी सुरजसिंग राजूसिंग चितोडीया रा. केसरनगर, भुसावळ याला भेटून औषधांबाबत विचारणा केली. आपल्याकडे चांगल्यापध्दतीने औषध असल्याचे सांगितल्याने बोगस जडीबुटी देवून सुनिल पाटील यांच्याकडून 3 लाख 12 हजार वेळोवळी पैसे घेतले.

    फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर औषध घेणे बंद केले. त्यानंतर संशयित आरोपीने अश्लिल फोटो पाठवून धमकी देत अजून 1 लाख 68 हजाराची मागणी केली. याप्रकाराला कंटाळून सुनिल पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    दरम्यान संशयित आरोपी हा भुसावळ शहरात असल्याचे गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी सुरजसिंग राजूसिंग चितोडीया रा. केसरनगर, भुसावळ याला अटक केली. पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कोट्यवधींची रोकड न भरताच उपनिरीक्षक बेपत्ता; दक्षता पेट्रोलपंपातील आर्थिक गैरव्यवहाराचा संशय

    February 15, 2026

    दिल्लीच्या तरुणाच्या नावावर जळगावात फसवणूक : डॉक्टर व लॅब व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा !

    February 15, 2026

    गॅस कटरने कपाटाचे कुलूप तोडून दागिने लंपास !

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.