Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निवडणुकीपूर्वी १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या !
    क्राईम

    निवडणुकीपूर्वी १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

    editor deskBy editor deskJanuary 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जळगाव जिह्यात पोलीस विभागात काही अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत प्रशासकीय पदस्थापना व बदल्या करण्यात आल्या आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण १५ अधिकारी बाहेरील जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात येत असल्याचे आदेश निघाले आहे.

    यात अहमदनगर येथून पोनि.मधुकर साळवे यांची प्रभारी चोपडा शहर पोलीस स्थानकाला तर नाशिक ग्रामीण येथील पोनि.विकास देवरे अमळनेर पोलीस स्थानकाला, पोनि.सुनील पाटील भडगाव पोलीस स्थानकाला, पोनि.संदीप रणदिवे रामानंदनगर पोलीस स्थानकाला, भुसावळ बाजार पेठचे पोनि.बबन आव्हाड यांची प्रभारी एमआयडीसी पोलीस स्थानकाला, भुसावळ शहर पोलीस स्थानकाचे सपोनि. संतोष चव्हाण प्रभारी अडावद पोलीस स्थानकाला, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.निलेश राजपूत यांची प्रभारी कासोदा पोलीस स्थानकाला, नाशिक ग्रामीण येथून सपोनि.प्रकाश काळे हे प्रभारी पिंपळगाव हरे. पोलीस स्थानकाला, पिंपळगाव हरे. येथील सपोनि.महेद्र वाघमारे, एमआयडीसी पोलीस स्थानकाला, धुळे येथून सपोनि.गणेश फड यांची नियंत्रण कक्षात, अहमदनगर येथून सपोनि.तेजश्री पाचपुते नियंत्रण कक्षात, नाशिक ग्रामीण येथून सपोनि.कल्याणी वर्मा यांची जळगाव शहर पोलीस स्थानकाला, नाशिक ग्रामीण येथून पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांची निंभोरा पोलीस स्थानकाला, अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची देखील नियंत्रण कक्षात आले असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी आदेश काढले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026

    ४५ वर्षीय प्रौढाने घरी कुणीही नसताना घेतला टोकाचा निर्णय !

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.