• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वाद विकोपाला : भाच्याने मामाला संपवलं !

editor desk by editor desk
January 16, 2024
in क्राईम, राज्य
0
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !

वर्धा : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच वर्धा शहरात मामा-भाच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या घरगुती मुद्द्यांवरुन वाद होत होते. एक दिवस हा वाद विकोपाला गेला. भाच्याने चक्क मामाच्या डोक्यावर विटेने प्रहार करीत जबर मारहाण केलीय. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. प्रकाश देवराव मसराम असे मृतकाचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणात  संशयित आरोपी खुशाल राजू तुमडाम (२५) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

आरोपी खुशाल आणि मृतक प्रकाश हे दोघेही मामा-भाचे आहेत. हिंगणघाटच्या इंदिरानगर येथील एकाच घरात राहत होते. दोघांमध्ये नेहमी घरगुती वाद होत होते. याच घरगुती वादातून ९ जानेवारी रोजी आरोपी खुशालने मामा प्रकाशच्या डोक्यावर विटेने गंभीर प्रहार करुन त्यास रक्तबंबाळ केले. मात्र, उपचारादरम्यान मामा प्रकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकाशची पत्नी कांता हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी खुशालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी खुशालने प्रकाश मसराम याच्या डोक्यावर विटेने मारहाण केली. मामा प्रकाशला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून खुशालला घाबरगुंडी सुटल्याने स्वत:ला वाचविण्यासाठी त्याने स्वत:च प्रकाशला उपजिल्हा रुग्णालयात नेले आणि प्रकाश हा दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाल्याचे सांगितले. प्रकाश यांना प्राथमिक उपचारानंतर तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले मात्र, प्रकृती नाजूक असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Previous Post

संपत्तीसाठी पत्नी व प्रियकराने केली बिल्डरची हत्या !

Next Post

१७ वर्षीय मुलीने घरात घेतला गळफास !

Next Post
१७ वर्षीय मुलीने घरात घेतला गळफास !

१७ वर्षीय मुलीने घरात घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !
क्राईम

जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

July 2, 2025
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

एखाद्या खास कामासाठी बनवत असलेली योजना यशस्वी होणार !

July 2, 2025
आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group