जळगाव : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी शनिवार, १३ जानेवारीला काढले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षकांचा समावेश असून, यातील पाचजण जिल्ह्याच्या बाहेर जाणार असून, तीन अधिकारी जिल्ह्यात अकार्यकारी अधिकारी पदावर (‘साईड ब्रैच’) राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी मार्च, एप्रिलमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिक परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. नवीन अधिकारी आल्यानंतर त्यांना सोमवार किंवा त्यानंतर पोलिस ठाणे मिळू शकेल. ज्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून पुढील आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे. महानिरीक्षकांच्या नंतर आता पोलिस महासंचालक आणि तदनंतर जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात येणार आहे.
यांच्या झाल्या बदल्या
जयपाल हिरे, ज्ञानेश्वर जाधव, शिल्पा पाटील, रामकृष्ण कुंभार, अरुण धनवडे, राहुल खताळ, कांतीलाल पाटील, राजेंद्र पाटील,