पुणे : वृत्तसंस्था
जगभरात २०१९ मध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1 चा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. शहरांसह राज्यातील गावांतही कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची रुग्ण आढळू लागले आहे. पुण्यातील मुळशी येथेही नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यांने खळबळ उडाली आहे.
रुग्णाला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र मुळशी तालुका आरोग्य विभागाकडून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सोमवारी 10 जानेवारीला राज्यात 98 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर 138 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहे. सोमवारी राज्यात एकूण 13644 कोविड टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 2355 या आरटीपीसीआर टेस्ट होत्या तर 11289 या आरएटी टेस्ट होत्या. राज्यात सध्या कोरोनाचे 891 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.