चाळीसगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरात मागील महिन्यात शिवपुराण कथा मोठ्या उत्साहात पार पडली होती. पण आता जिल्हावासीयासाठी पुन्हा एकदा पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन चाळीसगाव येथे दि.१६ ते २० जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील मालेगावरोड स्थित सुमारे ४० एकर परिसरात १६ ते २० जानेवारीपर्यंत प्रभू श्रीराम महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाविकांची उपस्थिती या महाशिवपुराण कथेला लाभणार आहे. खासदार उन्मेश पाटील, अपर पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची पाहणी करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाययोजनांची चचर्चा केली.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक संदीप पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, आशुतोष खैरनार, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, पालिकेचे वीज अभियंता महाले, पंढरीनाथ पवार, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, प्रभाकर चौधरी, देविदास चौधरी, संजय पवार, पद्माकर पाटील, तुषार भावसार, प्रशांत वाघ, सौरत पाटील, सारंग जाधव, अमित सुराणा, चेतन वाघ, भाऊसाहेब पाटील, रवींद्र चौधरी, मयूर साळुंखे, बंटी चौधरी किशोर गुंजाळ, सचिन राठोड, पप्पू राजपूत, बाळासाहेब शिनकर, कल्पेश मालपुरे, साहेबराव काळे, सागर गुंजाळ नरेंद्र जैन आदी उपस्थित होते.