धुळे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात महिलासह तरुणी आमिषाला बळी पडत विनयभंग सह अत्याचाराच्या घटना घडत आहे. नुकतेच धुळ्यातील एका ४० वर्षीय महिलेला नोकरी लावून देतो असे सांगून ठाणे येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. हा प्रकार २० मे २०२० ते १३ जून २०२३ या कालावधीत घडला. याप्रकरणी भडगाव तालुक्यातील गिरड येथील संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, घरकाम करणाऱ्या या महिलेला त्याने ठाणे येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेतले. तिला शीतपेयामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच, त्याचे व्हिडीओ चित्रण करून ते समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. संशयिताने तिला अहमदाबाद, सुरत येथे तसेच धुळ्यात तिच्या घरी येऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी धुळे शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.