Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भररस्त्यावर मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसाशी घातली हुज्जत !
    क्राईम

    भररस्त्यावर मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसाशी घातली हुज्जत !

    editor deskBy editor deskJanuary 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात वाहतूक पोलीसासोबत हुज्जत घालण्याच्या घटना नेहमीच चर्चेत येत असतांना नुकतेच कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका मद्यधुंद तरुणाने पोलिसाशी हुज्जत घालत शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे शिविगाळ करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांने सांगितलं असून याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला होता. तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी अडवलं . कागदपत्रांची तपासणी करत या तरुणाने मद्यप्राशन केल्याचं लक्षात आल्याने पोलिसांनी त्याची ब्रेथ एनलायझरने तपासणी सुरू केली. यावेळी या तरुणाने व त्याच्यासोबत आलेल्या दोन्ही महिलांनी वाहतूक पोलिसांसोबतच अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली ,पोलिसांशी हुज्जत घालायला लागले.

    याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. वाहतूक पोलिसांनी या तरुणाविरोधात मद्यप्राशन करत गाडी चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.तसेच या तरुणाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच उद्धट वर्तन केल्याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.