Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एसीबीची कारवाई : दंडाच्या रक्कमेपोटी घेतली १ लाखांची लाच !
    क्राईम

    एसीबीची कारवाई : दंडाच्या रक्कमेपोटी घेतली १ लाखांची लाच !

    editor deskBy editor deskJanuary 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरात महावितरणचे कंत्राटी वायरमन असलेले प्रशांत विकास जगताप (वय ३३)  याने तब्बल १ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला MSEB जळगांवच्या पथकाने भेट दिली होती. या भेटीनंतर त्यांना आता ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष १ लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. प्रशांत विकास जगताप (वय ३३) यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

    यांनी केली कारवाई
    पोलिस उप अधीक्षक – श्री.सुहास देशमुख, सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, सफौ दिनेशसिंग पाटील , पोना. सुनिल वानखेडे,पो.ना. बाळू मराठे ,पोशी. राकेश दुसाने पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पोशी अमोल सूर्यवंशी, पोशी सचिन चाटे यांनी ही कारवाई केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नवीन बायपासवर पहाटेचा भीषण अपघात; सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

    March 2, 2026

    पाणी भरण्याचा प्रयत्न ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय धिरजचा मृत्यू

    March 2, 2026

    “सर्वोच्च न्यायालयाच्या अटक वॉरंट”ची धमकी; १८ लाखांची सायबर लूट !

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.