जळगाव : प्रतिनिधी
एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा सोशल मिडीयावर फोटो एडीट करुन टाकण्याची धमकी देत एका मुलाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडीत विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडीता व विधीसंघर्ष बालक हे जळगाव शहरात एका खाजगी क्लासेसमध्ये जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असताना जुलै 2022 पासून ते मार्च 2023 पावेतो या कालावधीत विधीसंघर्ष ग्रस्त बालकाने पीडीत विद्यार्थिनीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत पिडीतेसोबत वारंवार शारीरीरीक संबंध केले. याप्रकरणी भा.दं.वि कलम 376 (2) (छ), 506, सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.