छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून नेहमीच चर्चेत येणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात राडा होत असल्याने चर्चेत आली आहे. राज्याचे महायुती सरकारमधील अल्पसंख्ख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा १ जानेवारी रोजी वाढदिवस होता या दिवशी वाढदिवसाचं सेलिब्रेशन धुमधडाक्यात व्हावं, यासाठी मंत्रीमहोदयांनी सिल्लोड शहरात गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला होता.
राज्यातील शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येत असतांना या कार्यक्रमात देखील त्यांनी गौतमी पाटील यांच्या चाहत्यांना शिवीगाळ केल्याने चर्चेत आले आहे. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठते. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या मोठी पोस्टर्सबाजी देखील करण्यात आली. गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर खेड्यापाड्यातून अनेक तरुणांनी सिल्लोड येथे गर्दी केली.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी भरस्टेजवरुन शिवीगाळ केली…#AbdulSattar #GautamiPatil #Sillod #Maharashtra pic.twitter.com/pXOAQHyOv6
— Satish Daud Patil (@Satisdaud0705) January 4, 2024
दरम्यान, गौतमीचा कार्यक्रम सुरू होताच तरुणांनी नेहमीप्रमाणे हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रम मध्यस्थी बंद पडला. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार तरुणांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. सत्तार यांनी स्टेजवर येत माईक हातात घेतला. हुल्लडबाजी तरुणांवर लाठीमार करा, असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. इतकचं नाही, तर सत्तार भर स्टेजवरून तरुणांना शिवीगाळ देखील केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करीत आहेत. महायुती सरकारमधील इतक्या मोठ्या मंत्र्याला भर स्टेजवरून शिवीगाळ करण्याची भाषा शोभते का? असा सवाल सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील नागरिक उपस्थित करीत आहेत.