पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत असून नुकतेच पुणे शहरात देखील गुन्हेगारी वाढत आहे. नुकतेच एका बापाने जन्मदात्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाघोलीत घडली आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोलीत वडिलांकडून अक्षदा फकीरा दुपारगुडे या मुलीवर धारधार शस्त्राने वार केला आहे. जन्मदात्या बापाने अक्षरशः स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोके, हात-पायावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत जन्मदात्या बापाने मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या मावशीच्या फिर्यादीवरुन लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.