Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शरद पवार – ठाकरेंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला !
    राजकारण

    शरद पवार – ठाकरेंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला !

    editor deskBy editor deskDecember 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या मुद्यावर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसशी (पवार गट) जवळपास मतैक्य झाल्याचे स्पष्ट केले. जागावाटपाच्या मुद्यावर आमचे राष्ट्रवादीशी जवळपास एकमत झाले आहे. पुढील 2 दिवसांत आमची वंचित बहुजन आघाडीशी चर्चा होईल. पण काँग्रेसने अद्याप आमच्याकडे जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला पाठवला नाही, असे ते म्हणालेत.

    राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील संजय वाघेरे यांनी शनिवारी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर, मविआतील जागा वाटप व लोकसभा निवडणुकीसह विविध मुद्यांवर भाष्य केले.

    ठाकरे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीशी आमची बोलणी सुरू आहे. पुढील 2 दिवसांत संजय राऊत यांच्या नेतृत्वात वंचितशी बोलणी होईल. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व वंचित यांची बैठक होऊन पुढील संवाद साधला जाईल. विशेषतः प्रकाश आंबेडकर व माझी प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर हा मुद्दा निकाली काढला जाईल. पण त्यांनी ठेवला 12-12 चा कोणताही फॉर्म्युला माझ्यापर्यंत आला नाही, असे ते म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्यसभा रणभूमी: महायुती- महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी ताण वाढला

    February 25, 2026

    मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव; जरांगे पाटलांकडून उपोषणाचा इशारा !

    February 25, 2026

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.