Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील चौघांना स्थानबद्धतेचे आदेश : हातभट्टीची दारू विकणे पडले महागात !
    क्राईम

    जिल्ह्यातील चौघांना स्थानबद्धतेचे आदेश : हातभट्टीची दारू विकणे पडले महागात !

    editor deskBy editor deskDecember 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    विनापरवाना गावठी हातभट्टीची दारूविक्री आणि धोकादायक व्यक्ती ठरलेल्या जिल्ह्यातील चार जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यानुसार चारही जणांची वेगवेगळ्या कारागृहांत रवानगी करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल असलेल्या योगेश भरत राजपूत (२९, रा. जामनेर) हा बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारूविक्री करत होता. त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली. मात्र त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठविला. तसेच पहूर पोलिस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेला सुपडू बंडू तडवी (४२, रा. चिलगाव, ता. जामनेर) हा देखील हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी पाठविला. या शिवाय रावेर पोलिस ठाण्यात शेख शाहरुख शेख हसन (२६, रा. रावेर) याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच योगेश देवीदास तायडे (३३, रा. भुसावळ) याच्यावरदेखील भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल दाखल आहेत.

    पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चारही प्रस्तावांचे अवलोकन करून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले. त्यानुसार त्यांनी चारही जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हेगार योगेश राजपूत याला ठाणे, सुपडू तडवी याला अमरावती, शेख शाहरुख शेख हसन याला कोल्हापूर कारागृहात आणि गुन्हेगार योगेश तायडे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; ‘माझा घातपात करण्याचा कट सरकारकडून दडपला जातोय’

    December 8, 2025

    मध्यरात्री महिलेच्या घरात शिरून केला विनयभंग !

    December 8, 2025

    बायपासवर भीषण अपघात; कार दोनदा उलटून थेट ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडक

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.