जळगाव : प्रतिनिधी
अल्पवयीन असतानाही विवाह करून दिला त्यातच मुलीला जन्म दिल्याचा प्रकार दि. २७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि आई-वडिलांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहते. अल्पवयीन असताना तिच्या आई-वडिलांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील एका तरुणाशी लग्न लावून दिले. हे लग्न ऑगस्ट २०२२ मध्ये झाले. त्यानंतर पिडीतीने मुलीला जन्म दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीसह सासू, सासरे आणि आई-वडिलांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दयानंद सरवदे हे करीत आहे.